हिंदी सक्ती केल्यास मातृभाषा बाजूला पडेल, शरद पवार यांचे मत

हिंदी सक्ती केल्यास मातृभाषा बाजूला पडेल, शरद पवार यांचे मत

पाचवीपर्यंत तिसऱ्या भाषेची सक्ती करू नये असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच हिंदी सक्ती केल्यास मातृभाषा बाजूला पडेल असेही शरद पवार म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती करू नये. पाचवी नंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. देशाचा एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो. आणि त्यामुळे हिंदीला अगदी त्याज्य करावे असे नाही. पण हे जरी खरं असलं तरी मुलांना एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात करू शकेल त्यावर भाषेचा किती दबाव टाकावा लागेल याचाही विचार करणे गरजेचे आहे. तो दबाव टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर ते अयोग्य ठरेल. म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीचा हट्ट सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची असली पाहिजे असे शरद पवार म्हणाले.

तसेच त्याच्यानंतर जे काही करायचं असेल पाचवीनंतर कुटुंबातील लोक निर्णय घेतील, त्याला आमचा विरोध नाही. पण आता जे बाकीचे सगळे लोक बोलत आहेत, की ठाकरे बंधू जे म्हणाले त्यात काही चुकीचं नाही. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील तर भुमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ती चांगली बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;