Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी चार किलो चांदीची घागर अर्पण

Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी चार किलो चांदीची घागर अर्पण

वै.ह.भ.प. जयदेव हरी भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे भोईर बंधू यांनी 4 किलो 150 ग्रॅम वजनाची चांदीची घागर श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चरणी अर्पण केली. या घागरीची किंमत 4 लाख 33 हजार एवढी आहे. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. त्यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. या चांदीच्या घागरीचे सुमारे 4 किलो 150 ग्रॅम वजन असून, त्याची अंदाजीत रक्कम 4 लाख 33 हजार होत आहे. देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत.

सद्यस्थितीत, आषाढी यात्रा 2025 चा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसरात व दर्शन रांगेत गर्दी होत आहे. देणगीदार भाविकांना देणगी देण्यासाठी ज्यादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय, सोने चांदीच्या स्वरूपातील वस्तू भेट स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला असून, त्यासाठी विभाग प्रमुख, लिपिक व अनुभवी सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. इच्छुक भाविकांनी देणगी व सोने-चांदी भेटवस्तू देण्यासाठी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असे मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;