पुदिना साठवण्याच्या या 5 पद्धती आपल्या सर्वांसाठी आहेत खूप गरजेच्या

पुदिना साठवण्याच्या या 5 पद्धती आपल्या सर्वांसाठी आहेत खूप गरजेच्या

पुदिना केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीराला थंडावा देखील देतो. बऱ्याचदा आपण  आठवड्याभरासाठी पुदिना खरेदी करतो, परंतु दोन ते तीन दिवसांत त्याची पाने काळी पडू लागतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला पुदिना बराच काळ ताजा ठेवायचा असेल तर तुम्हाला तो योग्यरित्या कसा साठवायचा हे माहित असायला पाहिजे.

पुदिना कापडात किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा

पुदिना अनेक दिवस ताजा ठेवायचा असेल तर तो नीट धुवून वाळवा आणि नंतर तो टॉवेल किंवा सुती कापडात गुंडाळा आणि हवाबंद डब्यात ठेवा. असे केल्याने पुदिन्यातील ओलावा कमी होईल, ज्यामुळे पाने लवकर खराब होत नाहीत. पुदिना 5-7 दिवस ताजा राहू शकतो.

पुदिना देठासह पाण्यात ठेवा

पुदिन्याची पाने एका पाण्याने भरलेल्या काचेच्या किंवा वाटीत देठासह ठेवा. अशा प्रकारे ठेवल्याने पुदिन्याची मुळे सुकत नाहीत आणि ती 8-10 दिवस हिरवी आणि ताजी राहते.

पुदिना बारीक करुन बर्फाचे क्युब्स बनवा

जास्त पुदिना असेल तर तो बारीक करून बर्फाच्या क्यूब ट्रेमध्ये थोडे पाणी घालून फ्रीजरमध्ये फ्रीज करण्यासाठी ठेवा. गरज पडल्यास एक किंवा दोन क्यूब्स काढा आणि वापरा. ​​हे क्यूब्स 1 ते 2 महिनेही खराब होत नाही आणि जेवणात वापरली जाऊ शकतात.

 

पुदिना हवाबंद डब्यात ठेवा

पुदिन्याची पाने उन्हात किंवा मायक्रोवेव्हमध्ये वाळवा. नंतर ती कुस्करून हवाबंद डब्यात ठेवा. या पुदिन्याचा पावडरच्या स्वरूपात वापर करू शकता. ही पद्धत वर्षभर फायदेशीर आहे. त्यामध्ये पुदिन्याची चव आणि सुगंध जिवंत राहतो.

पुदिना ऑलिव्ह ऑइलचे क्यूब्स 

पुदिन्याची पाने चिरून घ्या, ती एका बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा, त्यात ऑलिव्ह ऑइल टाका आणि फ्रीज करा. ही पद्धत विशेषतः पिझ्झा, पास्ता किंवा ग्रेव्हीच्या पदार्थांमध्ये उपयुक्त आहे. यामुळे पुदिन्याचा स्वाद आणि सुगंध बराच काळ टिकून राहतो आणि तुम्ही ते कधीही सहजपणे वापरू शकता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;