हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार, तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल

हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार, तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल

>> अमोल होले

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवंड येथील मंगळवारचा मुक्काम आटोपून भक्तिमय वातावरणात रोटी घाट सर करत बारामती तालुक्यातील उंडवडीच्या दिशेने आज मार्गस्थ झाली. संध्याकाळच्या पाचच्या सुमारास पालखी सोहळ्याने विठुनामाच्या जयघोषात दौंड तालुक्याचा निरोप घेऊन बारामती तालुक्यात दाखल झाला.

तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील देहू ते पंढरपूर प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे. पाटसपासून काहीच अंतरावर असलेल्या रोटी घाटामध्ये तुकोबांच्या पालखीने सहा बैलजोड्यांच्या साहाय्याने घाट पार केला. रोटी घाटामध्ये रोटीच्या ग्रामस्थांकडून पालखीमधील तुकोबांच्या पादुकांची पूजा आणि आरती करण्यात आली.

तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा मंगळवारी वरंवड येथे मुक्काम होता. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास हरिनामाच्या गजरात वरवंडचा निरोप घेऊन पालखी पाटसकडे मार्गस्थ झाली. पालखीचा दुपारचा विसावा आणि भोजन पाटस गावात असल्याने सकाळी नऊच्या सुमारास हा पालखी सोहळा पाटसमध्ये दाखल झाला. यावेळी सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच आदी मान्यवरांसह ग्रामस्थांनी वैष्णवजनांचे उत्साहात स्वागत केले.

पालखी पाटसच्या ग्रामदैवत नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि विसाव्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी पाटस आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आणि अश्वाचे दर्शन घेतले.

विसाव्यावेळी दिंड्यादिंड्यांमधून भजन, कीर्तनाचे सूर उमटत होते. दरम्यान, यावेळी पाटसमधील अनेक भाविक, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना चहा, पोहे, पाणी बाटली, केळी यांचे वाटप केले. तसेच वरवंड आरोग्य केंद्राच्या पथकाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. याचा अनेक वारकऱ्यांनी लाभघेतला. दुपारचे भोजन आणि विसावा घेऊन पालखी आणि वारकऱ्यांनी रोटीकडे वाटचाल केली. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रोटी घाटात दुपारी साडेबाराच्या सुमारास दाखल झाला. रोटी घाटातील पालखी रथाचे अभूतपूर्व चित्र पाहण्यासाठी अनेकांनी उंच ठिकाणी जाऊन हजेरी लावली होती. पालखी रथाला अधिकच्या सहा बैलजोड्या जुंपून रोटी घाट पार करण्यात आला. रोटी घाटामध्ये ठिकठिकाणी विसाव्यासाठी पालखी रथ थांबवण्यात आला होता. रोटी, हिंगणीगाडा, वसुंदे येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने उत्साहात स्वागत करत दर्शन घेतले.

दरवर्षीप्रमाणे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. तसेच प्रशासनाने योग्य नियोजन केले होते.

नीरा येथे संत सोपानकाकांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

टाळ-मृदंगांच्या गजरात अन् हरिनामाच्या जयघोषात आज दुपारी साडेबारा वाजता संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे नीरा येथे उत्साहात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले.

श्री संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याने मांडकी येथील मुक्काम आटोपून सकाळी सात वाजता मार्गस्थ झाला. जेऊर येथे सकाळी साडेसात वाजता सकाळच्या न्याहरीकरिता विसावला. पिंपरे खुर्द येथे सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास विश्रांतीकरिता सोहळा थांबला. दुपारी साडेबारा वाजता दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नगरीत दाखल झाला. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, राजेश काकडे आदींसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.

तरुणांनी रथातून पालखी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी ठेवली. नितीन कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सोपानकाकांच्या पादुकांची विधिवत पूजा केली. यानंतर दुपारचे भोजन झाले. त्यानंतर पालखी सोहळा दुपारी तीन वाजता बारामती तालुक्यातील निंबूत येथील मुक्कामाकरिता मार्गस्थ झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल