शिंदेंना काही माहिती नाही, तेव्हा ते गोधडीत रांगत होते; संजय राऊत यांची खरमरीत टीका

शिंदेंना काही माहिती नाही, तेव्हा ते गोधडीत रांगत होते; संजय राऊत यांची खरमरीत टीका

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. याच कार्यक्रमात शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला सशर्त पाठिंबा दिल्याचे विधान केले. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

गुरुवारी सकाळी माध्यमांनी संजय राऊत यांना शिंदेंच्या विधानाबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले की, तेव्हा शिंदे गोधडीत रांगत होते. आम्ही कॉलेज जीवनात होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्ही वारंवार या गोष्टी ऐकल्या आहेत. शिंदेंनी बाळासाहेबांचे नाव घ्यायचे थांबवले पाहिजे. त्यांनी मोदी, शहा मंत्राचा जप केला पाहिजे. शहांनीच त्यांना शिवसेना बिदागीत दिली आहे. पण शिवसेनेच्या विचारांचा वारसा त्यांना अजिबात पेलवणार नाही.

बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमालाही शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला. याबाबत शिंदेंना काहीही माहिती नाही, ते बरळत आहेत. आणीबाणीत बाळासाहेबांची काय भूमिका होती हे आम्हाला माहिती असून त्यांना काही धडे हवे असतील तर त्यांचा क्लास घ्यायला मी स्वत: तयार आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

अदानीला हाकलून देणे हेच महाराष्ट्राचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’, संजय राऊत यांचा हल्लाबोल

ज्यांनी देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण केली, अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहेत. यांच्यामुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणी लावावी लागली. एक बहुमतातले सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षाचे 40-50 खासदार परकीय शक्तींच्या मदतीने कारवाया करत होते. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली. हे अराजकवादी लोक होते आणि शिंदे त्यांच्याबरोबरच आहेत. तेव्हाही त्यांचे काम पक्ष फोडणे, अस्थिरता निर्माण करणे, पैशाच्या ताकदीवर दादागिरी करणे हे होते. यांना परकीय चलन मिळत होते, आताही मिळतात. त्यांचे एक हस्तक म्हणून शिंदे काम करत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, शरद पवार यांचा सणसणीत टोला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;