डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप, तरुणाची निर्दोष मुक्तता

डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप, तरुणाची निर्दोष मुक्तता

मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील धाराशिव जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुद्ध केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणी (डीएनए) ने खोटा ठरवला आणि त्या तरुणाची पोक्सो कायद्यांतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. खोट्या आरोपामुळे त्या तरुणाला सात महिने तुरुगांत खितपत राहावे लागले होते. सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुद्ध पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ही बाब न्यायालयात तिच्या उलट तपासात उघड झाली.

मोहोळ तालुक्यातील 17 वर्षे 6 महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान, तिची बार्शी येथील एका रुग्णालयात सोनोग्राफी केली असता, ती पंधरा आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आहे. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातही ती गर्भवती असल्याचे शिक्कामोर्तब झाले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले.

शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात केला. पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला. त्यावेळी तिने डिसेंबर 2021 मध्ये आरोपीने ती महाविद्यालयात गेली असता, तिला तलावाकाठी नेऊन तिच्यावर बलात्कार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध बलात्कारव पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक झाली. तपासादरम्यान सदर गर्भआरोपीपासूनच झाला आहे, हे शाबित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीचा रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील अ‍ॅड. धनंजय माने यांनी फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. तिने उलट तपासात कबुली दिली की, 2019 साली गावातील एका तरुणासोबत घरात नको त्या अवस्थेत वडिलांनी पाहिले. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुद्ध फिर्याद देण्यास लावली. अ‍ॅड. माने यांनी केलेला युक्तिवाद, डीएनए चाचणी आणि तरुणीची विसंगतपूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनतर न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपीतर्फे अ‍ॅड. धनंजय माने, अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. शरद झालटे, अ‍ॅड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले.

खोट्या आरोपावरून सात महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसानभरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;