जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे ‘ऑपरेशन बिहाली’, बसंतगडमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे ‘ऑपरेशन बिहाली’, बसंतगडमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड येथील बिहाली परिसरात गुरुवार सकाळी हिंदुस्थानी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘ऑपरेशन बिहाली’ अंतर्गत दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या कारवाईत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे, तर ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे हिंदुस्थानी लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हे संयुक्त ऑपरेशन सुरू केले. व्हाइट नाइट कॉर्प्सने यावर माहिती देताना X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “ऑपरेशन बिहाली: विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारावर हिंदुस्थानी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी बसंतगडच्या बिहाली परिसरात संयुक्त कारवाई सुरू केली.” जम्मू झोनचे आयजीपी भिम सेन तुटी यांनी सांगितले की, “ही चकमक सकाळी लवकर सुरू झाली आणि ऑपरेशन अद्याप सुरू आहे.”

दरम्यान, हे ऑपरेशन अमरनाथ यात्रेच्या एक आठवडा आधी होत आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ गुहा मंदिराला भेट देण्यासाठी येणार असल्याने सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले पुणे बाजार समिती टेंडरसाठी आजी – माजी खासदारांचे मोहोळ, मर्जीतल्या ठेकेदारांसाठी नियम बदलले
पुणे बाजार समितीने नुकसानीत जाऊन कमी रकमेच्या वाहन तळाच्या ई निविदा राबवल्या आहेत. यासाठी नियम अटी पण मर्जीतल्या ठकेदारांच्या सोयीने...
समृद्धीमुळे भ्रष्टनाथ शिंदेंची समृद्धी झाली पण रस्ता खड्ड्यात गेला, आदित्य ठाकरे यांची टीका
आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!
पंतप्रधानांनी कितीही अघोरी कृत्य केली तरी या देशाच्या लोकशाहीची हत्या करता येणार नाही; संजय राऊत यांचा घणाघात
मॅट्रिमोनी साईटद्वारे महिलेची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक, पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर चेंगराचेंगरी, 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू; 260 हून अधिक जखमी