बबनराव, घर विकून पैसे दिले का? भाजपवाल्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरली आहे – कैलास पाटील

बबनराव, घर विकून पैसे दिले का? भाजपवाल्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरली आहे – कैलास पाटील

“बबनराव, घर विकून पैसे दिले का? भाजपवाल्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरली आहे”, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना कैलास पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

X वर एक पोस्ट करत कैलास पाटील म्हणाले आहेत की, “भाजपवाल्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरली आहे. ज्या मायबाप जनतेच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, ज्यांच्या मतावर तुम्ही सत्तेत बसलात. त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगायली हवी. मात्र त्यांचेच माय-बाप तुम्ही काढत सुटलात. याच जनतेने कर रुपाने भरलेला पैसा सरकार वेगवेगळ्या योजनांमधून तुटपुंज्या स्वरुपात देत आहे. तरीही प्रचंड उपकार केल्याचा आव आणून बेताल वक्तव्ये भाजपचे नेते करीत सुटले आहेत.”

कैलास पाटील म्हणाले, “बबनराव लोणीकर, कराच्या रुपाने जमा झालेल्या पैशावर जनतेचाच अधिकार आहे, तो त्यांच्याच हक्क आहे. मात्र तुम्ही जणू घर, शेत विकून स्वत:च्या खिशातील पैसे दिल्याचा आव आणताय. तुम्ही ज्यांच्या अंगावरच्या कपड्याच्या बाता मारताय, तीच जनता उद्या तुमच्या अंगावरचे कपडे अन् तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्या.अशीच मस्तवाल भाषा करीत रहाल तर तुम्ही ज्यांची पायताने काढताय, तीच पायताने कशा पद्धतीने परत करायची, हेही या जनतेला चांगलेच ठाऊक आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;