PUBG खेळता-खेळता गेम झाला! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला 55 तुकडे करण्याची धमकी
पबजी खेळता खेळता विवाहिता ऑनलाईन गेममधील पार्टनरच्या प्रेमात पडली. मात्र अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत होता. पतीने महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता पत्नीने त्याला 55 तुकडे करून ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील भटीपुरा मोहल्ल्यात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
मिठाई बनवण्याचे काम करणाऱ्या 30 वर्षीय शीलू रॅकवारचा 2022 मध्ये आराधनाशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी आराधनाला पबजी खेळण्याचा नाद लागला. पबजी खेळता खेळता आराधनाची लुधियानातील शिवम नामक तरुणाशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
अनैतिक प्रेमामुळे आराधनाने हळू हळू पतीपासून दुरावा निर्माण केला. तसेच खोटे आरोप करत भांडण करायची. मुलाला मारहाण करायची. यानंतर पतीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता तिने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. जर आपल्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण केल्यास 55 तुकडे करत ड्रममध्ये भरेन, अशी धमकी आराधनाने पतीला दिली.
काही दिवसांपूर्वी आराधनाच्या प्रियकरानेही तिच्या घरी येऊन भांडण केले. आराधनाही प्रियकरासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागली. अखेर पतीने स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षेसाठी पोलिसात तक्रार दिली. यानंतर आराधना प्रियकरासोबत निघून गेली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List