Home Cleaning Tips – घराची साफसफाई करताना या चुका अजिबात करु नका

Home Cleaning Tips – घराची साफसफाई करताना या चुका अजिबात करु नका

आपल्या घराची साफसफाई हा सर्वात महत्त्वाचा दिवस. घरी खास पाहुणे येणार असतील किंवा काही लग्न समारंभ असल्यावर, घराची साफसफाई करणे हे क्रमप्राप्त होते. परंतु साफसफाई करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. अनेकदा आपण काहीही प्लॅनिंग न करता घाईघाईमध्ये घराच्या साफसफाईचा निर्णय घेतो. त्यामुळे आयत्या वेळी खूपच गोंधळ उडतो. म्हणूनच घराची साफसफाई करण्याआधी काही गोष्टी न विसरता लक्षात ठेवा. घाईगडबडीत कोणत्याही चुका करण्यापेक्षा, कधीही विचार करुनच निर्णय घ्यावा.

Kitchen Cleaning Tips- तुमच्या किचनमधील झुरळांचा कर्दळकाळ आहे हे औषध, फक्त 10 रुपये येईल खर्च

बरेच लोक कोणत्याही निश्चित नियोजनाशिवाय स्वच्छतेला सुरुवात करतात. परंतु अशी नियोजनशून्य कामे ही व्यवस्थित पूर्ण होत नाहीत. म्हणूनच घराच्या कोणत्या भागापासून ते कोणत्या भागापर्यंत स्वच्छता करायची या सर्वाचं नीट प्लॅनिंग करायला हवं.

तुम्ही आधी व्हॅक्यूम करून नंतर धूळ साफ केली तर ही सर्वात वेंधळी चूक ठरेल. म्हणूनच आधी सर्व धूळ साफ करुनच, मग व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करावा. म्हणूनच आधी वर असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. जसे की फर्निचर, पंखे, शेल्फ इत्यादींवर धूळ आधी झाडून घ्यावी.

बरेचजण काचेच्या, लाकडाच्या किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर थेट क्लिनरचा वापर करतात. असा वापर करणे योग्य नाही. यामुळे फर्निचर खराब होण्याचा धोका असतो.

साफसफाई करताना प्रथम एक एक रुमची साफ सफाई करायला घ्यावी. म्हणजे इतर ठिकाणी ती घाण पसरत नाही. मुख्य म्हणजे तुम्ही जो झाडू, मॉप किंवा कापड वापरताय तो सतत धूत राहा. असे न केल्यास, धूळ आणि घाण संपूर्ण घरात पसरेल.

Kitchen Cleaning Tips – किचनमध्ये पालींची संख्या वाढलीय, काळजी करु नका! हे 3 प्रकारचे स्प्रे पालींवर पडतील भारी

काही घरांमध्ये वाॅशिंग मशीनमध्ये एकाच वेळी बरेच कपडे धुण्यासाठी टाकले जातात. यामुळे कपडे नीट स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे मशीनवरही खूप लोड येतो. म्हणूनच घराची साफसफाई दरम्यान वाॅशिंग मशीनमध्ये कपडे टाकताना विचार करुनच टाकायला हवा.

अनेक घरांमध्ये बाथरुमच्या स्वच्छतेबद्दल फार सजगता नसते. मुख्य म्हणजे घराच्या साफसफाई बरोबरीने बाथरुमची स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच साफसफाई केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी बाथरुमच्या स्वच्छतेसाठी एक दिवस काढायलाच हवा. यावेळी बाथरुममधील टॉयलेट सीट, नळ, सिंक आणि बादली अशी स्वच्छता करायला हवी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;