Axiom 4 – शुभांशु शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचले, ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी डॉकिंग

Axiom 4 – शुभांशु शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचले, ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी डॉकिंग

नासाच्या ऑक्सिऑम 4 मोहिमेअंतर्गत अवकाशात झेपावलेले ‘फाल्कन-9’ हे रॉकेट आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचले असून ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी डॉकिंग करण्यात झाले आहे. 28 तासांच्या प्रवासानंतर गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 3 मिनिटांनी कॅप्सूल डॉक करण्यात आले. नासाच्या या मोहिमेअंतर्गत हिंदुस्थानी हवाई दलाचे ग्रृप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात पोहोचून इतिहास घडवला आहे.

अमेरिकेच्या जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरवरून आज दुपारी 12 वाजता नासाच्या ‘फाल्कन 9’ या रॉकेटने उड्डाण भरले. या मोहिमेचे नेतृत्व ज्येष्ठ व अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन करणार आहेत. त्यांच्यासोबत शुभांशु शुक्ला, पोलंडचे स्लावोज युनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कापू हे देखील आहेत.

अंतराळात झेप घेणारे शुभांशु ठरले दुसरे हिंदुस्थानी

1984 साली सोव्हिएत रशियाने हाती घेतलेल्या अंतराळ मोहिमेत हिंदुस्थानचे राकेश शर्मा सहभागी झाले होते. हिंदुस्थानकडून अंतराळात भरारी घेणारे ते पहिले अंतराळवीर ठरले होते. त्यानंतर शुभांशु हे दुसरे अंतराळवीर असून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ते पहिलेच भारतीय ठरणार आहेत. शुभांशु हे मूळचे उत्तर प्रदेशच्या लखनौचे रहिवासी आहेत. एक वर्षाच्या कठोर प्रशिक्षण आणि चाचणीनंतर नासाने त्यांची या मोहिमेसाठी निवड केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;