छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. अबुझमदच्या घनदाट जंगलात ही चकमक झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात संयुक्त मोहीम राबवत आहे. जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय निमलष्करी दल या कारवाईत सहभागी आहेत.

तथापि, मृतांच्या आकडेबाबत अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. सर्च मोहिमेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. अलिकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 1440 आत्मसमर्पण, 1464 अटक, 821 शस्त्रे आणि 1360 भूसुरुंग जप्त करण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;