ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर अंबादास दानवेंचा निशाणा

ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर अंबादास दानवेंचा निशाणा

‘मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच’, अशी उद्दाम भाषा वापरणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घणाघात चढवला आहे. ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती, लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, अशा शब्दात दानवे यांनी लोणीकर यांच्यावर निशाणा साधला.

जालना जिल्ह्यातील परतूर येथे एका कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. “कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले आहेत, तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बुट-चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे,” असे विधान लोणीकर यांनी केले होते. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली होती. यावर आता अंबादास दानवे यांनीही खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे यांनी बबनराव लोणीकर यांचा व्हिडीओ आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण, तुमचे कपडे, बूट या जनतेमुळे…आमदारकी जनतेमुळे…तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे…तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे…नेतेगिरी जनतेमुळे…विधानसभेतील स्थान जनतेमुळे…”, असा हल्लाबोल दानवे यांनी केला. तसेच यांचे हे बोल लक्षात ठेवा. निवडणूक येते आहे, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपला जनतेने निवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;