Onion Peel Benefits – कांद्याच्या सालींमध्ये दडलाय आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना, वाचा

Onion Peel Benefits – कांद्याच्या सालींमध्ये दडलाय आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना, वाचा

अनेकदा आपण भाज्या कापताना कांद्याच्या साली निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु याच कांद्याच्या साली आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. खासकरुन आपल्या सौंदर्यासाठी कांद्याच्या सालींचा उपयोग हा फार महत्त्वाचा मानला जातो. कांद्याच्या सालींचे आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित विविध फायदे आहेत. कांद्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. कांद्याची साल आरोग्यासोबत त्वचेसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे.

Benefits Of Onion – दररोज कच्चा कांदा खा आणि निरोगी राहा, वाचा

कांद्याच्या सालीचा वापर सौंदर्यासाठी कसा होतो हे जाणून घेऊया.

कांद्याच्या सालीमध्ये सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. याकरता कांद्याची साल ही पाण्यामध्ये उकळवून घ्यावी. हे पाणी नंतर थंड करुन, या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस गळणे कमी होते आणि कोंड्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

कांद्याच्या सालीचे पाणी हे आपल्या त्वचेसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे. कांद्याच्या सालीचे पाणी त्वचा खोलवर स्वच्छ करते आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी साले उकळून पाणी थंड करावे. हे पाणी आपल्या चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने लावावे. यामुळे त्वचा उजळण्यास तसेच त्वचेवरील डाग हलके होण्यास मदत होते.

 

कांद्याच्या सालीमध्ये असलेले क्वेरसेटिन हे अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते. तसेच कांद्याची साल ही सूप, काढा किंवा चहामध्येही वापरु शकतो.

पोटदुखी, सूज किंवा अपचन होत असल्यास, कांद्याच्या सालीचा काढा हा खूप फायदेशीर ठरतो. साले पाण्यात उकळून कोमट पाणी प्यावे, यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.

 

कांद्याच्या सालीमध्ये जळजळ कमी करणारे घटक असतात. सांधेदुखी, स्नायूंचा ताण किंवा सूज असल्यास, प्रभावित भागावर कांद्याच्या सालीचे पाणी लावल्याने आराम मिळतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी संबंधित तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;