माजी न्यायाधीशांवर स्वतःच्याच मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप, FIR रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

माजी न्यायाधीशांवर स्वतःच्याच मुलीने केला लैंगिक शोषणाचा आरोप, FIR रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका माजी न्यायाधीशांविरुद्ध त्यांच्या स्वत:च्या मुलीने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण धक्कादायक आणि गंभीर असल्याचं म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्या माजी न्यायाधीशांची याचिका फेटाळली. ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध विशेष पोक्सो न्यायालयात खटला चालणार आहे.

या माजी न्यायाधीशांवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 (स्त्रीच्या अब्रूला धक्का लावण्याच्या उद्देशाने हल्ला) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 7, 8, 9 (एल), 9 (एन) आणि 10 अंतर्गत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. याचिकाकर्त्याने दावा आहे केला की, त्यांचे पत्नीसोबत वैवाहिक वादामुळे ते वेगळे राहत असून, हे आरोप खोटे आणि द्वेषपूर्ण हेतूने दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला की, ही एफआयआर त्यांच्या पत्नीसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक आणि वैवाहिक खटल्यांच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांनंतर दाखल करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, या आरोपांमुळे त्यांचे आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त झाले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या युक्तिवादांना नाकारत मुलीने केलेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन खटला पुढे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणातील एफआयआर 21 जानेवारी 2019 रोजी भंडारा जिल्ह्यात येथे दाखल करण्यात आली होती, जी मे 2014 ते 2018 या कालावधीतील कथित घटनांशी संबंधित आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. परंतु विशेष पोक्सो न्यायालयात अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;