विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली.

शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्गावरील खड्डे, अतिवृष्टी, लाडकी बहिण योजना, महाराष्ट्राच्या तिजोरीतला खडखडाट अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक या अधिवेशनात महायुती सरकारला घेरणार आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजणार आहे, असे बोलले जात आहे.

मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या झाली. याच अधिवेशनात अजित पवार गटाने नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;