मक्यापासून बनवलेले 5 पदार्थ पावसाची मजा द्विगुणित करतील
पावसाळ्यात मका खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, मग तो उकळवून असो किंवा भाजून. पण पावसाळ्यात तुम्ही घरी असाल तर तुम्ही मक्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकता. कॉर्नची चव फक्त चविष्टच नसते, तर त्यात प्रथिने आणि फायबर देखील असतात. चला जाणून घेऊया त्यापासून बनवलेले 5 पदार्थ.
पावसाळ्यात कांद्याची भजी, ब्रेड पॅटीस, समोसे असे अनेक पदार्थ खातो, त्याचप्रमाणे मका देखील भाजून किंवा उकळून खातो मात्र याशिवाय आपण मक्याचे चाट बनवतो. मात्र मक्यापासुन काही नवीन ट्राय करायचे असेल तर वेगवेगळ्या पाककृतींबद्दल जाणून घेऊ ज्यामुळे पावसाळा आणखी आल्हाददायक होईल.
कॉर्न टिक्की
सर्वप्रथम, मका वाफवून घ्या किंवा उकळवून घ्या. त्याचे दाणे वेगळे करा आणि ते पिळून घ्या जेणेकरून जास्त ओलावा शिल्लक राहणार नाही.
त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन मिक्स करा. तसेच चिरलेल्या 2ते 3 हिरव्या मिरच्या, धणे, मीठ, लाल तिखट, धणे पावडर, चाट मसाला, चिमूटभर हळद मिक्स करा आणि या मिश्रणाची टिक्की तयार करा.
या सर्व टिक्कीना दोन्ही बाजूने बटर लावून पॅनमध्ये शालोफ्राय करा. तयार आहे. कॉर्न टिक्की मस्त गरमागरम टिक्की हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
कॉर्न सूप
एक कप कॉर्नचे दाणे घ्या (कॉर्न मक्सरमध्ये जाडे भरडे वाटून घ्या ).
एक चमचा आले-लसूण पेस्ट. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, एक ते दीड चमचा बटर किंवा तेल. अर्धा कप चिरलेल्या हिरव्या भाज्या, दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्या
सर्वप्रथम एका पॅनमध्ये बटर किंवा तेल गरम करा आणि त्यात आले-लसूण पेस्ट परतवून घ्या . त्यानंर त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घाला आणि त्या देखील परतवून घ्या आणि नंतर कॉर्न घाला आणि दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.
तीन कप पाणी घाला आणि उकळू द्या जेणेकरून सर्वकाही चांगले शिजेल. कॉर्न फ्लोअरमध्ये थोड्या पाण्यात मिक्य करुन त्याची स्लरी बनवा.
सूप सतत ढवळत हळूहळू ही स्लरी मिसळा. 10 मिनिटांनी तुमचा सूप तयार होईल. त्यात काळी मिरी पावडर आणि मीठ घाला आणि एक मिनिट चांगलं शिजवून घ्या आणि नंतर तयार सूप कांद्याच्या पातीने सजवा आणि सर्व्ह करा.
कॉर्न भजी
पावसाळा हा भजी खाल्ल्याशिवाय अपूर्ण असतो. यावेळी कुरकुरीत कॉर्न भजी बनवून बघा.
सर्वप्रथम सर्व मक्याचे दाणे काढून हलक्या हाताने कुस्करून घ्या जेणेकरून दाणे थोडे कुस्करले जातील, नाहीतर भजी तळताना ते फुटण्याची शक्याता असते.
कुस्करलेल्या मक्यामध्ये लाल तिखट, काळी मिरी, चिरलेली हिरवी मिरची, चाट मसाला, कोथिंबीर, चिरलेला कांदा घाला आणि नंतर शेवटी बेसन आणि मीठ घाला.
गरज पडल्यास तयार मिश्रणात पाणी घाला आणि गरम तेलात भजी तळून घ्या. चहा किंवा चटणीसोबत पावसात कॉन भजींचा आनंद घ्या.
कॉर्न बटाटा चीज बॉल्स
मक्यापासुन हा पदार्थ बनवण्यासाठी प्रथम बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या, त्यात उकडलेले बटाटे घाला आणि ते मॅश करा.
उकडलेले स्वीट कॉर्न, कढीपत्ता, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, मीठ, हळद आणि इतर मूलभूत मसाले घालून चांगले मिक्स करा. आता सर्व तयार मिश्रणात थोडे चीज घाला आणि या मिश्रणाचे मध्यम आकाराचे बॉल्स बनवा.
हे बॉल्स तुम्ही तेलात तळू शकता याशिवाय एअरफ्राय देखील करु शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List