विधानसभा निवडणूक मतदान घोळाची सुनावणी पूर्ण, हायकोर्ट 25 जूनला निकाल देणार

विधानसभा निवडणूक मतदान घोळाची सुनावणी पूर्ण, हायकोर्ट 25 जूनला निकाल देणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी पूर्ण झाली. सुनावणीच्या अंतिम दिवशीही अ‍ॅड. आंबेडकर यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांच्या युक्तीवादाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आणि याबाबत 25 जून रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. याचिकेवर न्यायालय कोणता निर्णय देतेय, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाखांहून अधिक मतदान झाले, असा आरोप ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात केला होता. याबाबत विक्रोळी येथील रहिवासी चेतन अहिरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी अंतिम सुनावणी झाली. युक्तीवादासह प्रतिवादी निवडणूक आयोग व सरकारची बाजू ऐकून घेत न्यायालयाने ही सुनावणी पूर्ण करत अंतिम निकाल राखून ठेवला आहे.

सुनावणीत ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला. आंबेडकर यांच्या दाव्याची खंडपीठाने नोंद घेतली. मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी 76 लाखांहून अधिक मतदान झाले. 288 मतदारसंघांपैकी 19 जागांवर घोषित मतांपेक्षा जास्त मतदान झाले, तर 76 जागांवर कमी मतदान नोंद झाले, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

खंडपीठाने याप्रकरणी फेब्रुवारीत झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीसही बजावली होती. संपूर्ण विधानसभा निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;