स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा भगवा फडकवा; विनायक राऊत यांचे चिपळूणमध्ये आवाहन

स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा भगवा फडकवा; विनायक राऊत यांचे चिपळूणमध्ये आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण दौऱ्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वेध घेत, संघटनात्मक बांधणीसह कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे स्पष्ट संकेत राऊत यांनी यावेळी दिले. कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत राऊत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जोमाने आणि नियोजनपूर्वक कामाला लागावे. इच्छुकांनीही पक्षाचे काम अधिक गांभीर्याने घ्यावे, असे ते म्हणाले.

बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या आणि स्थानिक प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा संघटक संतोष थेराडे, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, जिल्हा उपसंघटक व माजी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, महिला संघटक वैशाली शिंदे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे संयोजन प्रशांत मुळे यांनी केले. राऊत यांच्या या दौऱ्यामुळे पक्षात नवचैतन्य संचारले आहे.

एनडीआरएफ टीमला दिले पाठबळ
बैठकीनंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमची भेट घेतली. अधिकाऱ्यांशी संवाद साधत, आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेतला. चिपळूणच्या भौगोलिक रचनेबाबत त्यांनी काही सूचना देत, “राहण्याची व जेवणाची कोणतीही अडचण भासल्यास ती आपण सोडवू,” अशी आपुलकीची हमीही दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;