सुधागड किल्ल्याकडे जाणाऱ्या पाच्छापूर मार्गावर कंबरतोड प्रवास; रस्त्याची चाळण, वाहनचालक मेटाकुटीला

सुधागड किल्ल्याकडे जाणाऱ्या पाच्छापूर मार्गावर कंबरतोड प्रवास; रस्त्याची चाळण, वाहनचालक मेटाकुटीला

सुधागड किल्ल्याकडे जाणाऱ्या पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर या मार्गाची अक्षरशः दैना उडाली आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना रोज कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकदा खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. या दुर्दशेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

15 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर हा रस्ता करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गाची रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी अवस्था झाली आहे. येथून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. खड्डे चुकवताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत असल्याने अपघात वाढले आहेत. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याने वाहनचालकांना कंबरदुखी, पाठदुखी आणि मणक्याचे आजार जडले आहेत.

विद्यार्थ्यांची पायपीट
शासनाने गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध केला आहे. यामध्ये सुधागड किल्ल्याचादेखील समावेश आहे, असे असताना मात्र किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच पाली ते दर्यागावाला जाणारी एसटी सेवा पाच्छापूरपर्यंतच असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना 3-4 किमीपर्यंत पायपीट करावी लागत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत गायकवाड यांनी सांगितले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;