ट्रम्प यांना नोबेल देण्यासाठी कौतुकसुमने उधळली! अमेरिकेची मेजवानी झोडणाऱ्या असीम मुनीरला पाकिस्तानींनीच झोडपले

ट्रम्प यांना नोबेल देण्यासाठी कौतुकसुमने उधळली! अमेरिकेची मेजवानी झोडणाऱ्या असीम मुनीरला पाकिस्तानींनीच झोडपले

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान फिल्ड मार्शल असीम मुनीर हे देशाचे नायक आहेत, असे भासवत होते. व्हाईट हाऊसकडून त्यांना विशेष आमंत्रण मिळाले होते. तेथे त्यांनी शाही मेजवानी झोडली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प शांतीदूत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि ट्रम्प यांना नोबेल मिळावे यासाठी कौतुकसुमने उधळत त्यांनी ट्रम्प यांची जबरदस्त तरफदारी केली. मात्र, आता इराण- इस्रायल हल्ल्यात अमेरिकेने थेट प्रवेश केल्याने पाकिस्तानात असीम मुनीरला जनता चांगलीच झोडपून काढत आहे.

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तरफदारी केली. यासाठी पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुढाकार घेतला होता. 18 जून 2025 रोजी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी ट्रम्प यांच्यालर कौतुकसुमाने उधळली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे आणि ते उघडपणे इस्रायल-इराण युद्धात सामील झाले आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी जनता सोशल मीडियावर मुनीर झोडपून काढत आहेत.

पाकिस्तानी पत्रकार अमीर अब्बास यांनी लिहिले की हा तोच ट्रम्प आहे, ज्याला पीएमएल-एन नेते ख्वाजा साद रफिक यांनी एकेकाळी चंगेज खान आणि हिटलर म्हटले होते, आज त्याच ट्रम्पला त्याच पक्षाच्या सरकारने नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. शेवटी, हे लज्जास्पद आणि भ्याड निर्णय कोण घेत आहे? यासाठी पाकिस्तानला नाही, तर असीम मुनीरला लाज वाटली पाहिजे, असे एका युजरने म्हटले आहे.

उम्माचा हवाला देत, कोणीतरी लिहिले की जनरल झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ यांच्यानंतर, आता फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी सिद्ध केले आहे की पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयसाठी उम्मा (इस्लामिक ऐक्य) किंवा इस्लामिक बंधुता महत्त्वाची नाही. त्यांच्यासाठी खरे महत्त्व फक्त अमेरिकन डॉलरचे आहे. एका पाकिस्तानीने लिहिले – जर अमेरिकन हल्ला यशस्वी झाला, तर त्याचे रेडिएशन (थर्मल रेडिएशन) पाकिस्तानसह संपूर्ण प्रदेशावर परिणाम करेल आणि लाखो लोक मरू शकतात. या अणु हल्ल्यासाठी हुकूमशहा असीम मुनीर तितकेच जबाबदार असतील.

असीम मुनीर पाकिस्तानी सैन्याचे शेवटचे प्रमुख ठरतील. आता एकतर सैन्य टिकेल किंवा पाकिस्तान, कारण भ्रष्ट सैन्य आणि पाकिस्तान – दोघेही जास्त काळ एकत्र टिकू शकत नाहीत, असे परखड मतही सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे. शाहबाज शरीफ, आसिफ झरदारी, नवाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. मुस्लिमांसोबत, आपल्या देशाशी आणि पाकिस्तानच्या लोकांशी यापेक्षा मोठा विश्वासघात काय असू शकतो? या देशाने या सर्वांकडून उत्तरे मागितली पाहिजेत आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर येत असल्याने असीम मुनीर नेहमीसारखे पुन्हा तोंडावर आपटले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;