Iran Attacks US Air Base: कुवेत, इराक, युएई, बहरीन, कतारने हवाई क्षेत्र बंद केले

Iran Attacks US Air Base: कुवेत, इराक, युएई, बहरीन, कतारने हवाई क्षेत्र बंद केले

इराण-इस्रायल युद्धात उडी घेऊन अमेरिकेने इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. तर इराणने देखील माघार घेणार नाही म्हणत अमेरिकेला प्रत्युत्तरासाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता. यानंतर इराणने सोमवारी कतारमधील अल-उदीद अमेरिकन हवाई तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यावृत्ताला इराणकडून दूजोरा देण्यात आला आहे. हा हल्ला अमेरिकेच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरात केला गेला असल्याचे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले.

‘अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर जे बॉम्बहल्ले केले, त्याच संख्येने क्षेपणास्त्रे आमच्या सैन्याकडून वापरण्यात आली आहेत’, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इराणने स्पष्ट केले की, ‘या कारवाईचा आमचे मित्र राष्ट्र कतारला कोणताही धोका नाही’.

या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने कुवेत, इराक, संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि कतार यांनी तात्पुरते त्यांच्या हवाई हद्दी (airspace) बंद केल्या आहेत.

Iran Strikes US Air Base in Qatar; Gulf Nations Shut Airspace Amid Rising Tensions

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;