Iran Israel War – America great again नंतर ट्रम्पची Iran great again ची खेळी सुरू; खोमेनींना उखडून फेकण्याचा निर्धार

Iran Israel War – America great again नंतर ट्रम्पची Iran great again ची खेळी सुरू; खोमेनींना उखडून फेकण्याचा निर्धार

इस्त्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. या युद्धामुळे जग आता दोन गटांमध्ये विभागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अमेरिकेने या युद्धात केवळ उडीच घेतली नाही तर खोमेनींना उखडून फेकण्याचा निर्धार केला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील निवडणूकांमध्ये America great again असे म्हणत निवडून आले होते. आता त्यांनी हीच खेळी Iran great again असे म्हणत सुरु ठेवली आहे.

विनाशाचे तांडव! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र केंद्रांच्या स्थितीची ट्रम्प यांनी दिली माहिती

इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सत्ता परिवर्तनाबाबत धक्कादायक विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींना उखडून फेकण्याचे मनसुबे या युद्धाच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. तसेच Iran great again असेही आता ट्रम्प म्हणत आहेत.

अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इस्रायली सैन्याचे अमेरिकेसोबत काम केल्याबद्दल आभार मानले. आता ट्रम्प यांनी इराणमधील सत्ता परिवर्तनाबाबत धक्कादायक विधान देखील केलेले आहे. त्यांनी खोमेनी यांनाच सत्तेवरून काढून टाकण्याचे संकेत दिले आहेत. Make Iran great again म्हणजेच MIGA असे म्हणत ट्रम्प यांनी सत्तेवरुन खोमेनींना फेकण्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेने B2 बॉम्बरद्वारे इराणवर हल्ला केला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या सैन्याचे कौतुक केले. इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुकेंद्रावर हल्ला केला. इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष १३ जून रोजी सुरू झाला आहे. या इस्रायली हल्ल्यात दोन्ही बाजूंनी मृतांची संख्या 1000 च्या आसपास पोहोचली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत 950 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून, 3450 जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;