पतीला संपवण्यासाठी विष आणलं, मग असं काय घडलं की पत्नीनेच ते प्राशन करत जीवन संपवलं?

पतीला संपवण्यासाठी विष आणलं, मग असं काय घडलं की पत्नीनेच ते प्राशन करत जीवन संपवलं?

अनैतिक संबंध, संपत्तीचा हव्यास या कारणातून पतीची हत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशी एक घटना कानपूरमध्ये उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी विष घेऊन आली. मात्र पतीला देण्याऐवजी स्वतःच विष प्राशन करत तिने जीवन संपवले. याप्रकरणी नवाबगंज पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

पती-पत्नीचं दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. एक वर्षाभर पती एका गुन्ह्यात तुरुंगवास भोगत होता. या काळात पत्नीचे पुतण्यासोबत सूत जुळले. दोन महिन्यांपूर्वी पती तुरुंगातून सुटून बाहेर आला. पतीला पत्नीच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे पत्नीवर लक्ष ठेवून होता. यादरम्यान त्याला पत्नीचे पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. एके दिवशी त्याने दोघांना रंगेहाथ पकडले.

पती अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने पत्नी आणि पुतण्याने त्याला मारण्याचा कट रचला. पतीला जीवे मारण्यासाठी पत्नी विष घेऊन आली. त्याच दिवशी पतीने पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा पुतण्यासोबत तिचे आक्षेपार्ह फोटो दिसले. यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणातून पतीसाठी आणलेले विष पत्नीने स्वतः प्राशन केले. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;