दिल्ली-जम्मू-दिल्ली; दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं, कारण काय?
दिल्लीहून जम्मूला एअर इंडियाचे विमान रवाना झाले. मात्र जम्मूला पोहचल्यानंतर लँडिंग न करताच दिल्लीला माघारी परतले. विमान दिल्लीला माघारी का वळवले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. सध्या याबाबत चौकशी सुरू आहे.
एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स-2564 हे विमान दिल्लीहून नियोजित वेळेत जम्मूला रवाना झाले. जम्मू विमानतळावर नियोजित वेळेवर पोहचल्यानंतर विमानाने आकाशातच काही वेळ घिरट्या घातल्या. यानंतर पायलटने विमान जम्मू विमानतळावर लँडिंग न करता पुन्हा दिल्ली विमानतळावर माघारी आणले.
जम्मू विमानतळावरील हवामान लँडिंगसाठी उपयुक्त होते. रनवेही वापरण्यास योग्य होते. यामुळे लँडिंगमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. असे असतानाही पायलटने विमान लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अद्याप एअरलाईन आणि पायलटकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List