पृथ्वी शॉचा मार्ग मोकळा! MCA ने NOC मंजूर केली, आता दुसऱ्या राज्याकडून मैदानात उतरणार

पृथ्वी शॉचा मार्ग मोकळा! MCA ने NOC मंजूर केली, आता दुसऱ्या राज्याकडून मैदानात उतरणार

स्टार खेळाडू पृथ्वी शॉने दुसऱ्या राज्याकडून व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची ऑफर असल्याचे सांगत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत (NOC) प्रमाणपत्राची मागणी केली होती. तसे पत्र त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला लिहिले होते. योग्य विचार केल्यानंतर MCA ने पृथ्वी शॉला NOC मंजूर केली आहे.

रणजी करंडक आणि त्यानंतर विजय हजारे करंडकातही पृथ्वी शॉला खराब कामगिरी आणि फिटनेसमुळे मुंबईच्या संघातून वगळण्यात आलं होतं. त्याला फिटनेस सुधारण्याचा आणि वजन कमी करण्याचा सल्ला MCA ने दिला होता. परंतु त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली नाही. अशातच त्याने दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी MCA कडे पत्राद्वारे केली होती. MCA ने पृथ्वी शॉच्या मागणीचा विचार करून त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. MCA ने यासंदर्भात माहिती दिली, “मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) हे कळवू इच्छिते की क्रिकेटपटू पृथ्वी शॉने आगामी देशांतर्गत हंगामात व्यावसायिक खेळाडू म्हणून दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी औपचारिकपने ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. योग्य विचार केल्यानंतर, MCA ने NOC मंजूर केली आहे.” अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली. त्याचबरोबर पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करत असल्याच सुद्धा MCA ने म्हटलं आहे. तसेच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;