Kitchen Cleaning Tips- स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन घाणेरडा आणि चिकट झाला आहे का? या टिप्स वापरा काम होईल फत्ते

Kitchen Cleaning Tips- स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन घाणेरडा आणि चिकट झाला आहे का? या टिप्स वापरा काम होईल फत्ते

आपल्या स्वयंपाकघरात नानाविध पदार्थ होत असल्यामुळे, सतत फोडणीचा धूर होत असतो. यामुळे किचनमधील एक्झाॅस्ट फॅन हा चिकट आणि घाणेरडा होतो. चिकट आणि तेलकट झालेला हा फॅन साफ करणं म्हणजे भव्यदिव्य काम असं वाटत राहतं. त्यामुळे आपण शक्यतो या कामाकडे दुर्लक्ष करतो. परंतु हा फॅन साफ करणे खरंतर सोपे आहे. काही सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांनी आपण हा फॅन पुन्हा एकदा नव्यासारखा चमकवु शकतो.

स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन असणे हे वरदानापेक्षा कमी नाही. पंखा स्वयंपाक करताना येणारा धूर बाहेर काढण्यास मदत करतो. कधीकधी तो इतका चिकट आणि काळा होतो की तो चालू केल्यावर कचरा खाली पडू लागतो. आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु ही घाण पंख्याचा वेग देखील कमी करते, ज्यामुळे त्याला काम करणे कठीण होते.

एक्झाॅस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी, व्यावसायिक क्लिनरला बोलावण्यासाठी खूप पैसा लागेल. त्यापेक्षा घरच्या घरी हा फॅन क्लिन करणं केव्हाही उत्तम. याकरता फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचे आहे.

एक्झाॅस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
आवश्यक घटक:
गरम पाणी
2 टेबलस्पून बेकिंग सोडा
डिशवाॅश लिक्विड
आवश्यकतेनुसार पाणी

काय करावे:
सर्वात आधी फॅन क्लिन करण्याआधी त्याचे कनेक्शन बंद करावे.
त्यानंतर कोरड्या कपड्याने किंवा कागदाने फॅनवरील सर्व घाण स्वच्छ करावी.
मोठ्या बादलीमध्ये किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे.
कोमट पाण्यात बेकिंग सोडा आणि डिश लिक्विड घालावे.
नंतर हलक्या हाताने कपड्याने पुसून घ्यावे.
गरम पाण्याने फॅन लवकर साफ होतो आणि त्यावरील तेलकटपणाही चुटकीसरशी दूर होतो.

तुम्ही दर 15-20 दिवसांनी असे केल्यास, फॅनचा स्पिडही चांगला होईल.

एक्झॉस्ट फॅन स्वच्छ ठेवण्यासाठी टिप्स-

जास्त ग्रीस जमा होऊ देण्याऐवजी, दर 15 दिवसांनी एकदा कोरड्या कापडाने किंवा सौम्य डिश लिक्विडने पंखा पुसून टाका. यामुळे ग्रीसचा जाड थर जमा होण्यापासून रोखता येईल.

तुम्हाला एक्झाॅस्ट फॅन काढता येत असल्यास गरम पाण्यात, बेकिंग सोडा आणि डिटर्जंटच्या द्रावणात 15-20 मिनिटे बुडवा आणि हलक्या हाताने घासून धुवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;