Iran Israel War – इस्रायल हा जमीन बळकवणारा शिकारी; संतापलेला हुकूमशहा किम जोंग उनही युद्धात उतरणार?

Iran Israel War – इस्रायल हा जमीन बळकवणारा शिकारी; संतापलेला हुकूमशहा किम जोंग उनही युद्धात उतरणार?

इस्त्रायल आणि इराणच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. या युद्धामुळे जग आता दोन गटांमध्ये विभागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच अमेरिकेने युद्धात घेतलेली उडी ही उत्तर कोरियाच्या हुकूमशहाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच इस्त्रायल हा जमीन बळकवणारा शिकारी असल्याचे किम जोंगने नुकतेच म्हटले आहे. त्यामुळेच आता या युद्धात उत्तर कोरियाही उतरणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले

उत्तर कोरियाने इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर अमेरिकेने केलेल्या लष्करी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे असेही किम जोंगने म्हटले आहे. इस्रायल इराण युद्धावर कोरियाचे किम जोंग उन यांनी इराणवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. (The Democratic People’s Republic of Korea) डीपीआरकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, प्रादेशिक अखंडता आणि कोणत्याही स्वतंत्र देशाच्या सुरक्षा हितसंबंधांविरुद्ध आहे.

उत्तर कोरियाने म्हटले आहे की, एखाद्या देशाची प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्याला अडथळा आणणाऱ्या धमकीला किंवा शक्तीच्या वापराला विरोध करणे हा संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा मूलभूत आत्मा आणि उद्दिष्ट आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील हे स्वीकारले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत उत्तर कोरियाने म्हटले आहे की, अमेरिका इस्रायलला जमीन हडप करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

Iran Israel War – अमेरिकेच्या एअरस्ट्राइकनंतर इराण संतापला; आता ठोस कारवाई करा! सैन्याला दिला फ्री हॅन्ड

या निवेदनात असेही म्हटले आहे की, सध्या मध्य पूर्वेतील परिस्थिती जागतिक शांतता आणि सुरक्षिततेचा पाया पायदळी तुडवत आहे. याचे कारण इस्रायल सतत युद्ध आणि जमीन विस्ताराद्वारे एकतर्फी हितसंबंधांचा पाठलाग करत आहे. यामागे पाश्चात्य देशांची विचारसरणी आहे, ज्यांनी अशा कृतींना परवानगी दिली आणि प्रोत्साहन दिले.

उत्तर कोरियाने आरोप केला आहे की, अमेरिका आणि इस्रायलने शांतता राखण्याच्या आणि धोका दूर करण्याच्या बहाण्याने बळाचा वापर केला आहे. यामुळे तणाव अधिकच वाढला आहे. याचाच गंभीर परीणाम आता संपूर्ण जगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर झालेला आहे. निवेदनाच्या शेवटी, उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय समुदायाला अमेरिका आणि इस्रायलच्या या शत्रुत्वपूर्ण कृतींचा एकत्रितपणे निषेध आणि विरोध करण्याचे आवाहन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;