Kitchen Cleaning Tips- तुमच्या किचनमधील झुरळांचा कर्दळकाळ आहे हे औषध, फक्त 10 रुपये येईल खर्च

Kitchen Cleaning Tips- तुमच्या किचनमधील झुरळांचा कर्दळकाळ आहे हे औषध, फक्त 10 रुपये येईल खर्च

आपल्या किचनची स्वच्छता ही महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. किचनमध्ये अन्नपदार्थ शिजवत असल्यामुळे, किचनची स्वच्छता ही प्राधान्याने व्हायलाच हवी. खासकरुन आपल्या किचनमधील झुरळे ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरते. झुरळ स्वयंपाकघर, बाथरूम, कपाट अशा ठिकाणी वेगाने पसरतात आणि साफसफाई करूनही ते जात नाहीत. तुम्ही वारंवार कीटकनाशके फवारुन वैतागले असाल तर आता फक्त हा 10 रुपयांचा उपाय करुन बघा.. झुरळे पळतील कायमची दूर.

झुरळांसाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बोरिक पावडरचा वापर करणे. मेडिकल स्टोअरमध्ये छोटी बोरिक पावडरची पुडी ही अंदाजे 10 रुपयांना मिळते. या पावडरची खासियत अशी आहे की, ती झुरळाच्या शरीरात प्रवेश करते आणि आतून त्याला मारते.

बोरिक पावडर प्रभावी का आहे?

झुरळ बोरिक पावडरजवळ येतो तेव्हा ते त्याच्या पायांना आणि शरीराला चिकटते. काही तासांतच त्याचा मृत्यू होतो. एवढेच नाही तर जेव्हा झुरळ मरतो तेव्हा इतर झुरळे ते खातात आणि विष त्यांच्या शरीरातही जाते. अशाप्रकारे संपूर्ण झुरळं नष्ट होतात.

कसे वापरायचे?

बोरिक पावडर एका कागदावर ठेवून ती ओट्याखाली किंवा बेसिनखाली ठेवून द्यावी.

घराच्या ज्या ठिकाणी झुरळे वारंवार दिसतात, जसे की सिंकखाली, रेफ्रिजरेटरच्या मागे, बाथरूमचे कोपरे आणि कपाटांच्या आत अशा ठिकाणी बोरिक पावडर ठेवावी.

बोरिक पावडरपासून मुलांना आणि पाळीव प्राण्यांना दूर ठेवा.

परिणाम टिकवून ठेवण्यासाठी दर 2-3 दिवसांनी पावडर पुन्हा टाकत राहा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;