विनाशाचे तांडव! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र केंद्रांच्या स्थितीची ट्रम्प यांनी दिली माहिती

विनाशाचे तांडव! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र केंद्रांच्या स्थितीची ट्रम्प यांनी दिली माहिती

डोंगरावरचे खडक कोसळले…अण्वस्त्र केंद्राचे छप्पर खड्ड्यात गेले…अण्वस्त्रनिर्मितीचे नामोनिशाण मिटवले…यालाच म्हणतात विनाशाचे तांडव, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या उद्ध्वस्त केलेल्या अण्वस्त्र केंद्रांचे वर्णन केले आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायचित्रातून अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या विदारक0 विध्वंसाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की उपग्रहातील छायाचित्रातून असे दिसून येते की इराणमधील सर्व अणुऊर्जा केंद्र उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बंकर ब्लॅस्टर बॉम्बने अणुऊर्जा केंद्रांचे खरे नुकसान जमीनीच्या आत खोलवर झाले आहे. रविवारी अमेरिकेच्या बी-२ विमानांनी इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला, नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो यांना अमेरिकेने लक्ष्य केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे झालेल्या विध्वंसाचे वर्णन करण्यासाठी विनाशाचे तांडव हा योग्य शब्द आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ऑपरेशन मिडनाईट हॅमरचे कौतुक केले आहे. ट्रम्प म्हणाले आहेत की उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून येते की इराणमधील सर्व अणुस्थळांना मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रपती म्हणाले की या अणुस्थळांचे खरे नुकसान पृथ्वीच्या खाली खोलवर झाले आहे.

उपग्रह छायाचित्रांवरून असे दिसून येते की इराणमधील सर्व अण्वस्त्र स्थळांना मोठे नुकसान झाले आहे. डोंगरावरील खडक कोसळले आहेत, अण्वस्त्र केंद्राचे छत खड्ड्यात गेले आहे, बॉम्बच्या आगीतून काहीही वाचलेले नाही. हे वरवरचे नुकसान आहे. सर्वात जास्त नुकसान जमिनीखाली झाले आहे. अमेरिकेने तीन इराणी अण्वस्त्र केंद्रे पूर्णपणे नष्ट केली आहेत. यालाच म्हणतात अत्यंत यशस्वी हल्ला, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Iran Israel War – इस्रायल हा जमीन बळकवणारा शिकारी; संतापलेला हुकूमशहा किम जोंग उनही युद्धात उतरणार?

अमेरिकेकडून इराणच्या फोर्डो, नटानझ आणि इस्फहान या तिन्ही अणुस्थळांवर हल्ला करण्यात आला. 125 हून अधिक अमेरिकन विमानांनी या संपूर्ण कारवाईत भाग घेतला, ज्यात स्टेल्थ बॉम्बर्स, लढाऊ विमाने, डझनभर टँकर, पाळत ठेवणारी विमाने आणि सपोर्ट टीम यांचा समावेश होता. पेंटागॉनने याचे वर्णन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे B-2 लढाऊ ऑपरेशन म्हणून केले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या मते, हे मिशन आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे B-2 मिशन होते. या अमेरिकन ऑपरेशननंतर, अमेरिकेने पश्चिम आशियातील आपल्या लष्करी प्रतिष्ठानांची सुरक्षा वाढवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Iran Attacks American Base : इराणने दिलं प्रत्युत्तर, कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली Iran Attacks American Base : इराणने दिलं प्रत्युत्तर, कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली
इराणने सोमवारी प्रत्युत्तर देत कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचा हल्ला इतका...
जम्मू आणि कश्मीर हा हिदुस्थानचा अंतर्गत मुद्दा, परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीवर साधला निशाणा
लँडिंगच्या तयारीत होते एअर इंडियाचे विमान, अचानक बेशुद्ध पडले चार क्रू मेंबर्स; प्रवाशांमध्ये पसरली घबराट
नाट्यसप्तकाला नाशिककरांची मिळाली दाद, महाकवी कालिदास कला मंदिरात रंगला संस्कृत नाट्य महोत्सव
इस्रायलने इराणला युद्ध थांबवण्यासाठी पाठवला संदेश, Iran ने काय दिलं उत्तर? वाचा…
इस्त्रायलने इराणवर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बहल्ला, महत्वाच्या लष्करी तळांना केले लक्ष्य
IND Vs ENG 1st Test – ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शतके ठोकत विक्रमांना घातली गवसणी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातला दुसरा खेळाडू