Benefits Of Malasana- 15 दिवस मलासनात बसल्याने होतील खूप सारे आरोग्यवर्धक फायदे, वाचा  

Benefits Of Malasana- 15 दिवस मलासनात बसल्याने होतील खूप सारे आरोग्यवर्धक फायदे, वाचा  

योगामुळे शरीर लवचिक तर होतेच, पण आपल्या अंतर्गत आरोग्यातही चांगलीच सुधारणा होते. म्हणूनच मलासन हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. मलासनाला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवल्यास आपल्याला खूप सारे आरोग्यवर्धक फायदे मिळतात. विशेषतः मलासनाचा सराव हा आपल्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

मलासन करण्याचे फायदे?

सकाळी मलासनामध्ये बसून गरम पाणी पिण्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते.

मलासनात बसून कोमट पाणी पिल्याने शरीर आतून चांगल्या प्रकारे स्वच्छ होते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हलके आणि निरोगी वाटते.

महिलांसाठी मलासन करण्याचे खूप सारे उत्तम फायदे आहेत. मासिक पाळी अनियमित असल्यास, हे आसन केल्यामुळे पाळी पूर्ववत होण्यास सुरुवात होते.

अनेकांना सकाळी उठताच मळमळ किंवा उलट्या होण्यासारखी भावना निर्माण होते. अशांसाठी मलासन हे खूप महत्त्वाचे आहे.

मलासनात बसल्याने कंबरेची हालचाल वाढते. यामुळे आपले शरीर लवचिक होण्यासही मदत होते.

मलासनामध्ये असताना गरम पाणी पिण्यामुळे, शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभर उर्जादायी वाटते.

दिवसाची सुरुवात उत्तम करायची असेल तर, मलासनात बसून गरम पाणी पिणे हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो.

मलासन कसे करावे?

मलासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून चटईवर सर्वात आधी उभे राहावे. त्यानंतर गुडघे वाकवून स्क्वॅट करत खाली बसावे. हात आणि पायाचे तळवे यांचा स्पर्श एकमेकांना व्हायला हवा. त्यानंतर दोन्ही हात एकत्र करून हृदयासमोर आणा. तुमच्या कोपरांचा वापर करून तुमचे गुडघे हळूवारपणे बाहेरच्या दिशेने दाबा. तुमच्या टाचा जमिनीवर आहेत आणि तुमचा पाठीचा कणा सरळ आहे याची खात्री करा. जेव्हा तुम्ही या आसनात असाल तेव्हा पाणी प्या. तुम्ही कोमट पाणी देखील पिऊ शकता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;