विधानसभेच्या पोटनिवणुकीत दोन ठिकाणी ‘आप’चा विजय; भाजप, काँग्रेस आणि तृणमूलला प्रत्येकी एक जागा

विधानसभेच्या पोटनिवणुकीत दोन ठिकाणी ‘आप’चा विजय; भाजप, काँग्रेस आणि तृणमूलला प्रत्येकी एक जागा

चार राज्यांतील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण पाचपैकी दोन जागांवर आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. काँग्रेस, भाजप आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय झाला आहे.

गुजरातमधील कडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजेंद्र चावडा विजयी झाले आहेत, तर विसावदर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी विजय मिळवला आहे. केरळच्या नीलांबूर मतदारसंघात काँग्रेसने माकपचा पराभव करून ही जागा पुन्हा मिळवली आहे. पश्चिम बंगालच्या कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलीफा अहमद यांना भाजपच्या उमेदवाराविरोधात निर्णायक आघाडी मिळाली आहे. पंजाबच्या लुधियाना पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

19 जून रोजी झालेल्या या पोटनिवडणुकांमध्ये केरळमधील नीलांबूरमध्ये 75.27 टक्के, पश्चिम बंगालच्या कालीगंजमध्ये 73.76 टक्के, गुजरातच्या विसावदरमध्ये 56.89 टक्के आणि कडीमध्ये 57.91 टक्के मतदान झाले. पंजाबच्या लुधियाना पश्चिममध्ये 51.33 टक्के मतदान झाले होते.

गुजरातमधील कडी ही जागा आमदार करसन सोलंकी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती, तर विसावदरमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार भूपेंद्र भयानी यांनी राजीनामा दिला होता. केरळमधील नीलांबूर मतदारसंघ काँग्रेसचे पी. व्ही. अन्वर यांनी राजीनामा दिला होता. पंजाबच्या लुधियाना पश्चिमध्ये आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघ आमदार नसरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिक्त झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;