इस्त्रायलने इराणवर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बहल्ला, महत्वाच्या लष्करी तळांना केले लक्ष्य

इस्त्रायलने इराणवर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बहल्ला, महत्वाच्या लष्करी तळांना केले लक्ष्य

इस्त्रायलने इराणधील महत्वाच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे तेहरानमधील इराणच्या अंतर्गत सुरक्षा दलांच्या आणि इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या प्रमुख कमांड सेंटर आणि मालमत्तेवर 50 हून अधिक लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे.

इराणी राजवटीच्या लष्करी क्षमतांना नुकसान पोहोचवण्यासाठी तेहरान परिसरातील इराणच्या लष्करी मुख्यालय, क्षेपणास्त्र आणि रडार उत्पादन स्थळे तसेच क्षेपणास्त्र साठवणुकीला लक्ष्य करून हे हवाई हल्ले करण्यात आल्याचे इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे. याशिवाय, इस्रायली लढाऊ विमानांनी ‘सय्यद अल-शहादा’ ब्रिगेडवरही बॉम्बहल्ला केल्याचा इस्त्रायली सैन्याने दावा केला.

इस्त्रायली सैन्याने केलेल्या दाव्यानुसार, या हल्ल्यात आयआरजीसीच्या मध्यवर्ती सशस्त्र तळांपैकी एक असलेल्या ‘बासीज मुख्यालय’ला लक्ष्य करण्यात आले. इस्रायली हवाई हल्ल्यामुळे अल्बोर्झ कॉर्प्सचेही नुकसान झाले, जे तेहरानच्या आसपासच्या शहरांचे विविध धोक्यांपासून संरक्षण करते. याशिवाय इस्रायली लढाऊ विमानांनी इराणी राजवटीच्या लष्करी दलांचा भाग असलेल्या आणि इराणी अंतर्गत सुरक्षा दलांच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर आणि जनरल सिक्युरिटी पोलिसांनाही लक्ष्य केले. आयडीएफने असाही दावा केला आहे की त्यांच्या हवाई दलाने पश्चिम, मध्य आणि पूर्व इराणमधील सहा विमानतळांवर हल्ला केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;