Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीर पोलिसांनी संशयितांचे जारी केलेले ‘स्केच’ चुकीचे? सूत्रांच्या माहितीनंतर देशभरात संताप

Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीर पोलिसांनी संशयितांचे जारी केलेले ‘स्केच’ चुकीचे? सूत्रांच्या माहितीनंतर देशभरात संताप

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठा खुलासा केला आहे. एनआयएने म्हटले आहे की, हल्ला करणारे तीन दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते आणि ते लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते.

परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर या दोन कश्मिरी नागरिकांच्या अटकेनंतर हे उघड झाले आहे. दोघांवरही हल्लेखोरांना त्यांच्या घरात राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर सुविधा पुरवल्याचा आरोप आहे.

हल्ल्यातील संशयितांचे स्केचे चुकीचे?

याआधी बोललं जात होत की, हा हल्ला पाकिस्तानातील दोन आणि काश्मीरमधील एकाने केला होता. यातच पहलगाम येथील हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी हल्ल्यातील तीन संशयितांचे स्केचही जारी केले आहेत. मात्र हे स्केच चुकीचे चुकीचे होते, अशी माहिती आता समोर आली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं की, जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यातील संशयितांचे तीन स्केचे जारी केले होते. मात्र हे स्केच हल्लेखोरांचे नाहीत. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;