Sangli News – NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याकडून बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू

Sangli News – NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याकडून बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू

नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून शिक्षक पित्याने 17 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षक पित्याला अटक केली आहे. धोंडीराम भगवान भोसले असे अटक पित्याचे नाव आहे.

नेलकरंजी राहणारे धोंडीराम भोसले हे याच गावातील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. तर त्यांची पत्नी माजी सरपंच आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. धोंडीराम यांची मुलगी साधना नीट परीक्षेची तयारी करत होती. साधनाला नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने धोंडीराम यांना संताप अनावर झाला आणि यातून झालेल्या वादातून त्यांनी मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती ई-सकाळने आपल्या वृत्तात दिली आहे.

घटनेनंतर मुलीच्या आईने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धोंडिराम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. साधना बारावीत शिकत होती. यासोबतच ती नीट परीक्षेचीही तयारी करत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;