Mumbai News – कुर्ला आणि सायन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

Mumbai News – कुर्ला आणि सायन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, अप जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने सोमवारी रात्री सीएसएमटीकडे जाणारी अप जलद मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली. या घटनेमुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. सोमवारी रात्री 10.10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टीमने दुरुस्तीच्या कामासाठी तात्काळ ब्लॉक घेतला.

अप जलद मार्ग ठप्प झाल्याने काही जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, आसनगाव, कर्जत आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने सुरू होत्या. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;