कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने टाकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

कॅन्सरग्रस्त आजीला नातवाने टाकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

एका नातवाने आपल्या आजीला आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून पोबारा केला आहे. या आजींची तब्येत इतकी खालावलेली होती की त्यांना धड उठून उभंही राहता येत नव्हतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या आजीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिड डे या इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. आरे कॉलनीच्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक सत्तरीच्या घरातील महिला कण्हत होती. तिथल्या नागिरिकांनी या महिलेकडे पाहिल्यानंतर त्यांची भितीने गाळण उडाली. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांनी कळवले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना आरे कॉलनीच्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक महिला मरणासन्न अवस्थेत आढळली. या महिलेच्या नाकाला संसर्ग झाला होता आणि हा संसर्ग तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरला होता.

पोलिसांनी आधी या महिलेला पोलीस व्हॅनमधूनच जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंत पोलिसांनी या महिलेला कूपर रुग्णालयात नेले. तिथेही फक्त तपासून कूपर रुग्णालयाने त्यांना दुसरीकडे नेण्यास सांगितले.

महिलेची तब्येत अधिक खालावत चालली होती, तरीही कोणतेही हॉस्पिटल तिला दाखल करून घेत नव्हते. अखेर आठ तासांनी, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कूपर हॉस्पिटलने या महिलेला दाखल करून घेतले आणि उपचार सुरू केले.

ती महिला अत्यवस्थ अवस्थेत बोलताना म्हणाली की तिचं नाव यशोदा गायकवाड आहे. ती मालाडमध्ये नातवासोबत राहत होती. तिच्याच नातवाने तिला आर्य कॉलनीत आणून कचऱ्याजवळ सोडून दिल्याचा आरोप तिने केला.

उपचारानंतर या महिलेना आपले नाव यशोदा गायकवाड असल्याचे सांगितले. तसेच आपण मालाडमध्ये आपल्या नातेवाईकासोबत राहत असल्याची माहिती दिली. आपल्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्याचं या महिलेने सांगितले.

गायकवाड यांनी मालडचा आणि कांदिवलीचे दोन पत्ते दिले जिथे त्या आधी राहत होत्या. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन तपास केला. पण याबाबत काही माहिती मिळाली नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करून गायकवाड यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;