Iran Israel War – अमेरिका बनला इस्त्रायलचे सुरक्षा कवच, इराणचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र केले उद्ध्वस्त

Iran Israel War – अमेरिका बनला इस्त्रायलचे सुरक्षा कवच, इराणचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र केले उद्ध्वस्त

इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणने संयुक्त राष्ट्रांची आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अमेरिकेला उघडपणे धमकी दिली आहे. या बैठकीत इराणने आता सैन्याला फ्री हॅन्ड दिलेला असून, आता सर्व काही सैन्य ठरवेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी सांगितले होते की, ते इराणवर हल्ला करायचा की नाही याचा विचार करतील, परंतु नंतर अचानक अमेरिकेने हल्ला केला.

Iran Israel War – अमेरिकेच्या एअरस्ट्राइकनंतर इराण संतापला; आता ठोस कारवाई करा! सैन्याला दिला फ्री हॅन्ड

अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर हल्ला करत, इस्त्रायलसाठी महत्त्वाची भूमिका या युद्धात निभावली. इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागून प्रत्युत्तर दिले. परंतु अमेरिकेने त्यांचा हा हल्ला हाणून पाडला. इस्रायली आर्मी रेडिओच्या वृत्तानुसार, इराणी अणु केंद्रावर हल्ल्यानंतर त्यांनी इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. परंतु अमेरिकेने मात्र इराणचा हा प्रयत्न हाणून पाडला. अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र नष्ट केले. इराणने यापूर्वीही अनेक वेळा इस्रायलवर हल्ला केला आहे. या दरम्यान इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. इराणने एका मोठ्या रुग्णालयावरही हल्ला केला आहे, यात अनेक नागरीक जखमी झाले आहेत.

इराण इस्रायल युद्धाच्या काळ्या ढगात ‘होर्मुझ’वर संक्रात येण्याची शक्यता; तेल आयातीसाठी हिंदुस्थानने घेतला मोठा निर्णय

इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या हल्ल्यांना मोठा गुन्हा म्हटले आहे आणि इस्रायलवर हल्ला सुरुच राहील अशी शपथ घेतली आहे. अलिकडच्या हल्ल्यांनंतर खोमेनींनीही बदला घेण्याचा इशारा दिला आहे. इस्त्रायलसाठी हे युद्ध हीच शिक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी X वर लिहिले, “शिक्षा सुरूच आहे. ज्यू शत्रूने एक मोठी चूक केली आहे, एक मोठा गुन्हा केला आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा सध्या दिली जात आहे.”

इराणच्या तीन अणु केंद्रांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने कंबर कसली आहे. पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वोच्च सुरक्षा संस्थेसोबत आपत्कालीन बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय सुरक्षा समिती (NSC) ही देशातील सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वोच्च मंच आहे आणि त्याची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होते. लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासह देशाचे सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्व या समितीचा भाग आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;