Egg biriyani recipe – घरी बनवा परफेक्ट आणि टेस्टी अंडा बिर्याणी

Egg biriyani recipe –  घरी बनवा परफेक्ट आणि टेस्टी अंडा बिर्याणी

आपल्या आजूबाजूला असं कुणीच नसेल की, ज्याला बिर्याणी आवडत नाही. बिर्याणी हा असा पदार्थ आहे की, नाव ऐकताच सर्वांच्या तोंडला पाणी सुटते. व्हेज असो किंवा नाॅनव्हेज बिर्याणीची मज्जा काहीतरी वेगळी असते. तर आज आपण जाणून घेऊ परफेक्ट अंड्याची बिर्याणी रेसिपी

साहित्य
4-6 अंडी
200 ग्रॅम तांदूळ
खडा मसाला ( 3 लवंग, 2 काळी मिरी, मोठी इलायची, हिरवी इलायची, चक्रफुल , तमालपत्र )
1 मोठा बारीक कापलेला कांदा
1 बारीक कापलेले टोमॅटो
1 बटाटा बारीक चौकोनी कापलेला
अर्धी बारीक कापलेली भोपळी मिरची
1 बारीक कापलेली हिरवी मिरची
1 चमचा गरम मसाला
5 ते 6 चमचे दही
अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट
अर्धा चमचा जिरे पावडर
1 चमचा हळद
अर्धा चमचा लाल मिरची पावडर
अर्धा चमचा धने पावडर
1 चमचा बिर्याणी मसाला
2 चमचे तूप
कोथिंबीर आणि पुदीना
चवीपुरते मीठ

सर्वप्रथम तांदूळ नीट धुवून घ्या. थोडा वेळ भिजत ठेवावा जेणे करून तांदूळ थोडा फुलेल. त्यानंतर हा तांदूळ नंतर 70% शिजवून घ्या.

तांदूळ शिजवताना सर्वप्रथम तेलात जिरं, खडा मसाला, कोथिंबीर, लिंबाचा रस घाला आणि तांदूळ घाला आणि अधिकचे पाणी घालून शिजवून घ्या.

 

 

 

 

 

तांदुळ शिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला अंडी उकडून घ्या, अंडी उकडलेल्या अंड्यांच्या पांढऱ्या भागावर चिरा मारुन घ्या.

त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल, हळद, आणि लाल तिखट घालून अंडी सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या.

 

 

 

नंतर एका भांड्यात तेल टाकून ते गरम करा, त्यात कापलेला कांदा आणि मिरची टाकून त्याचा रंग तपकिरी होईपर्यंत परतवून घ्या यानंतर त्यात कापलेले टोमॅटो, शिमला मिरची आणि बटाटा टाका.

आता या मिश्रणाला मध्यम आचेवर आणखी 2-3 मिनिट शिजवून घ्या

 

 

 

नंतर यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, 2-3 हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबिर, 4-5 चमचे फेटलेलं दही आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या.

 

मिश्रणात अंडी घालून मिश्रण चांगलं परतवून घ्या नंतर त्यामध्ये शिजवलेला तांदूळ घाला आणि त्यानंतर पुरेसं पाणी कोथिंबिर, साजूक तूप घालून तांदूळ पुर्ण शिजवून घ्या. नंतर गरमागरम बिर्याणी थंडगार कोशिंबीर सोबत सर्व्ह करा.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;