Jammu Kashmir – वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन, बॅटरी कार सेवा आणि तीर्थयात्रा विस्कळीत

Jammu Kashmir – वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन, बॅटरी कार सेवा आणि तीर्थयात्रा विस्कळीत

जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतांवर असलेल्या वैष्णोदेवी मंदिराच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर सोमवारी भूस्खलन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या नवीन ट्रॅकवर भूस्खलन झाल्याने प्रशासनाने बॅटरी कार सेवा बंद केली.

मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली असून सुदैवाने यात कोणताही भाविक किंवा अन्य व्यक्ती जखमी झाले नाहीत. भूस्खलनानंतर भाविकांना जुन्या मार्गावर वळवण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यत्ययशिवाय प्रवास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिमकोटी मार्गावरील सत्य व्ह्यू पॉइंटजवळ भूस्खलन झाले. सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा या मार्गावर एकही भाविक उपस्थि नव्हता. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भूस्खलनानंतर वैष्णोदेवी तीर्थस्थळ मंडळाने तातडीने आपले कर्मचारी आणि मशीन्स ढिगारा हटवण्यासाठी तैनात केले. ढिगारा तीस फुटांपेक्षा अधिक परिसरात पसरलेला असल्याचे अधिकारी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;