Israel Iran Conflict : अमेरिकेने इराणवर विनाकारण हल्ला केला, पुतिन यांनी हल्ल्यांचा केला निषेध

Israel Iran Conflict : अमेरिकेने इराणवर विनाकारण हल्ला केला, पुतिन यांनी हल्ल्यांचा केला निषेध

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणवर झालेल्या हल्ल्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करताना, इराणवर विनाकारण कारण हल्ला करण्यात असल्याचा आरोप केला आहे. मॉस्को येथेइराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पुतिन यांनी ही प्रतिक्रिया दिली. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला असून, हे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचात यापूर्वीच इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. मात्र अमेरिकेने इराणच्या तीन परमाणु केंद्रांवर (फोर्डो, नतांज आणि इस्फहान) केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.

या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरवत पुतिन यांनी अमेरिकेच्या या कारवाईची तीव्र निंदा केली. ते म्हणाले आहेत की, “इराण कोणतेही ठोस कारण नसताना हल्ला करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण होण्याचा धोका आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;