मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर खाडीत कोसळला, पाण्यात बुडून चालकाचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर खाडीत कोसळला, पाण्यात बुडून चालकाचा मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी दुपारी टँकरचा भीषण अपघात झाला. टँकर पुलाची रेलिंग तोडून थेट खाडीत कोसळला. यामुळे पाण्यात बुडून टँकर चालकाचा मृत्यू झाला. नायगाव आणि भाईंदरला जोडणाऱ्या वर्सोवा पुलावर ही घटना घडली. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासकीय पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

अपघातग्रस्त टँकर गुजरातहून ठाण्याच्या दिशेने चालला होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिल्यानंतर चालकाने स्टेअरिंग वळवले. स्टेअरिंग वळवताच टँकरची लोखंडी ग्रीलच्या कठड्याला धडकला आणि कठडा तोडून खाडीत कोसळला. टँकर खाडीत पूर्ण बुडाला. यावेळी चालकाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

स्थानिकांनी चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. चालकाकडे ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकली नाही. चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अपघाताचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;