Buldhana News धक्कादायक! शिक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून शाळेने करून घेतली साफसफाई, व्हिडीओ व्हायरल

Buldhana News धक्कादायक! शिक्षणमंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून शाळेने करून घेतली साफसफाई, व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील सिनगाव जहाँ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून शाळा झाडण्याचे व कचरा उचलण्याचे काम करवून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाला लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आज सोमवार 23 जून रोजी विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले. त्याच दिवशी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे सिनगाव जहाँ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देणार होते. मात्र त्यांच्या आगमनापूर्वीच विद्यार्थ्यांना झाडू मारण्याचे, हातगाडी व पाण्याच्या बाटल्यांची पॅकेजेस उचलण्याचे काम दिले गेले. विद्यार्थ्यांच्या हातात स्वागताच्या पुष्पगुच्छांऐवजी झाडू देण्यात आल्याचे दृश्य या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येते. या घटनेने शिक्षण क्षेत्रातील नियोजन व शिक्षकांची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शासन पातळीवर ‘विद्यार्थ्यांचे स्वागत’ आणि ‘बालकेंद्रित शिक्षण’ यावर भर देण्यात येत असतानाही, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना श्रमाला लावणे अत्यंत निंदनीय असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असावा अशी अपेक्षा असते, मात्र सिनगाव जहाँ शाळेतील प्रकाराने त्या उत्साहावर पाणी फिरले आहे. हा प्रकार एकटा नसून, सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली होणार्‍या अशा प्रकारच्या शाळाबाह्य क्रियांना आळा घालणे आवश्यक आहे.

या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला. ‘शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना राबवून, मग त्यांच्याच हातात बिस्किटाचा पुडा देऊन स्वागत करायचं. ही नौटंकी महायुती सरकारने बंद करावी,’ असे त्यांनी सांगितले.

हा प्रकार उघड झाल्यानंतर पालक वर्ग व स्थानिक नागरिकांनी शिक्षण खात्याच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘बालकामगार कायद्याचे उल्लंघन करूनच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी जोर धरत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;