परीक्षा विभागाच्या गोंधळावरू युवासेना आक्रमक, सिनेट सदस्यांचे प्र कुलगुरूंच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन

परीक्षा विभागाच्या गोंधळावरू युवासेना आक्रमक, सिनेट सदस्यांचे प्र कुलगुरूंच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेला गोंधळासाठी जबाबदार परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. पूजा रौंदळे यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावे तसेच रुसा या शैक्षणिक उपक्रमाला जागा देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करत युवासेना सिनेट सदस्यांनी आज प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मुंबई विद्यापीठात शैक्षणिक तसेच इतर अनेक बाबतीत मोठे गोंधळ होत असून याला विद्यापीठाचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे. याबाबत युवासेना सिनेट सदस्यांनी वारंवार आवाज उठवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सातत्याने होत असलेल्या गोंधळाबाबत शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचडे, परमात्मा यादव, अल्पेश भोईर आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी प्र कुलगुरु डॉ. अजय भामरे यांच्या दालनाजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी परीक्षेतील गोंधळाला जबाबदार असलेल्या परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. पूजा रौंदळे यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;