माझ्या नवऱ्याला माओवादी घोषित करून गोळ्या घातल्या, छत्तीसगडमधील महिलेचा आरोप

माझ्या नवऱ्याला माओवादी घोषित करून गोळ्या घातल्या, छत्तीसगडमधील महिलेचा आरोप

बीजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका माओवादी नक्षलवाद्याचा मृत्यू झाला होता. पण आपला पती हा माओवादी नव्हताच असा दावा त्या मृत व्यक्तीच्या पत्नीने केला आहे. आपला पती एका शाळेत आचारी होता आणि विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन बनवायचा असे या महिलेने सांगितले आहे. पण मृत व्यक्ती बंदी असलेल्या कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चा सक्रिय सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

चकमकीत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव महेश कोडियम असून तो इरपगुट्टा गावचा रहिवासी होता. 10 जून रोजी इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत कोडियम ठार झाला. या कारवाईत माओवादी गटाचे दोन मोठे नेते गौतम ऊर्फ सुधाकर (केंद्रीय समिती सदस्य) आणि भास्कर राव (राज्य समिती सदस्य) यांचा मृत्यू झाला. पण महेशचा माओवाद्यांचा काहीही संबंध नव्हता. तो निरपराध होता असा दावा कोडियमच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच आम्ही गरीब आहोत, पण कायदेशीर मार्गाने जगतो असे त्याची पत्नी सुमित्रा कोडियम म्हणाली.

सुमित्राने सांगितले की 9 जून रोजी महेश जंगलात जनावरं आणायला गेला होता. संध्याकाळ झाली तरी तो परतलाच नाही. नंतर गावकऱ्यांकडून कळलं की सुरक्षा दलांनी त्याला पकडलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याला माओवादी घोषित करून चकमकीत ठार केलं होतं.

महेशला ज्याने काम दिलं तो रमेश उप्पल म्हणाला की महेश 2023 पासून शाळेत मध्यान्ह भोजन स्वयंपाकी म्हणून काम करत होता. पण एप्रिल पासून तो शाळेत आलाच नासल्याचे उप्पल यांनी सांगितले. याबाबत पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;