IND Vs ENG 1st Test – ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शतके ठोकत विक्रमांना घातली गवसणी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातला दुसरा खेळाडू

IND Vs ENG 1st Test – ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शतके ठोकत विक्रमांना घातली गवसणी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातला दुसरा खेळाडू

टीम इंडियाचा आक्रमक आणि स्टार फलंदाज ऋषभ पंतने हेडिंग्ल कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्य शतक ठोकून इतिहास रचला आहे. असा भीम पराक्रम कराणारा ऋषभ पंत जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. तर इंग्लंडमध्ये दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. पहिल्या डावात त्याने 134 धावा आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला इंग्लंडसमोर मोठी आघाडी उभी करण्यास मदत मिळाली आहे.

दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा ऋषभ पंत टीम इंडियाचा सातवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी विजय हजारे, सुनील गावस्कर यांनी तब्बल तीन वेळा दोन्ही डावांमध्ये शतक ठोकण्याची किमया साधली आहे. त्याच बरोबर राहुल द्रविडने दोन वेळा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी दोन्ही डावांमध्ये एकवेळा शतके ठोकली आहेत. विशेष बाब म्हणजे इंग्लंडमध्ये दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. तसेच दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा जगातील दुसरा यष्टिरक्षक ठरला आहे. या बाबतीत पहिल्या क्रमांकावर झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर आहे. त्याने 2001 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिल्या डावात 142 आणि दुसऱ्या डावात नाबाद 199 धावा केल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;