भाजपच्या काळात बलात्कार वाढले, अमेरिकेच्या अ‍ॅडव्हायझरीवरून रोहित पवार यांची सरकारवर टीका

भाजपच्या काळात बलात्कार वाढले, अमेरिकेच्या अ‍ॅडव्हायझरीवरून रोहित पवार यांची सरकारवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी हिंदुस्थान संबंधित जारी केलेल्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानात वाढत्या बलात्कार आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे आपल्या नागरिकांना, विशेषत: महिलांना, एकट्याने प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी हिंदुस्थानात प्रवास करण्यासाठी जाहीर केलेल्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरीमध्ये हिंदुस्थानात बलात्कार आणि गुन्हेगारी वाढत असल्याने काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच महिलांनी एकटे प्रवास न करण्याची सूचना केली आहे. साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेला हिंदुस्थानातील गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार दिसतात पण आपल्या सरकारला दिसत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.”

अमेरिकेची ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी काय आहे?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने 16 जून 2025 रोजी हिंदुस्थानसाठी लेव्हल-2 ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. यामध्ये अमेरिकी नागरिकांना हिंदुस्थानात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: बलात्कार आणि हिंसक गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करत, महिलांना एकट्याने प्रवास न करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय, जम्मू-कश्मीर, हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा, मणिपुर आणि मध्य व पूर्व हिंदुस्थानातील काही भागांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;