American base in Syria Attacked : सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला, पण…

American base in Syria Attacked : सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला, पण…

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आला आहे. याबाबत इराणी माध्यमांनी सोमवारी वृत्त दिलं आहे की, सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर हल्ल्याच्या 36 तासांनंतर सीरियातील अमेरिकेच्या तळावर हा हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामागे इराण असल्याचं बोललं जात आहे. मात्र इराणने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही. मात्र इराणने याआधी अमेरिकेला युद्धात उडी मारली तर ते मध्य पूर्वेतील त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य करेल, असा इशारा दिला होता.

इराणमधील Mehr News ने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील एका भागात अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरावनी यांनी तीन लक्ष्यांवर प्रतिहल्ला करण्याचे संकेत दिले होते. इरावनी म्हणाले होते की, अमेरिकेने आमचे जितके नुकसान केले आहे, तितकेच आम्ही त्यांचे नुकसान करू. यामुळेच सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर इराणने हल्ला केला असावा, असं बोललं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;