इशान किशनच इंग्लंडमध्ये धुमशान, पदार्पणाच्या सामन्यात केली धुवाधार फलंदाजी

इशान किशनच इंग्लंडमध्ये धुमशान, पदार्पणाच्या सामन्यात केली धुवाधार फलंदाजी

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. तर, दुसरीकडे इशान किशनने इंग्लंडमध्ये धुवाधार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. इशान किशन सध्या काऊंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर या क्लबकडून खेळत आहे. त्याने यॉर्कशायर या प्रसिद्ध क्लबविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात 87 धावांची आक्रमक फलंदाजी केली आहे. अवघ्या 13 धावांनी त्याचे शतक हुकले.

इशान किशनने काऊंटी चॅम्पियनशिपच्या दोन सामन्यांसाठी नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबसोबत करार केला आहे. सध्या त्याचा पहिला सामना यॉर्कशारविरुद्ध सुरू आहे. तर दुसरा सामना 29 जूनपासून सोमरसेट या क्लबविरुद्ध होणार आहे. पहिल्याच सामन्यात त्याने 94 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 1 षटकार मारत 87 धावा चोपून काढल्या. त्यामुळे संघाला त्याचा चांगला फायदा झाला. इशान किशन फॉर्मात असल्यामुळे 29 जून रोजी होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच धडाकेबाज फलंदाजीची अपेक्षा संघाला असणार आहे.

इशान किशनने दीड वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे BCCI च्या केंद्रिय करारातूनही त्याला वगळण्यात आलं होत. मात्र, त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि त्याचा केंद्रिय करारात पुन्हा समावेश करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;