इस्रायलने इराणला युद्ध थांबवण्यासाठी पाठवला संदेश, Iran ने काय दिलं उत्तर? वाचा…

इस्रायलने इराणला युद्ध थांबवण्यासाठी पाठवला संदेश, Iran ने काय दिलं उत्तर? वाचा…

इस्रायलने इराणला युद्ध थांबवण्यासाठी एक औपचारिक संदेश पाठवला आहे, असं वृत्त इस्रायलमधील स्थानिक माध्यमाने दिले आहे. इराणने या संदेशाला प्रतिसाद देताना म्हटले आहे की, युद्ध थांबवण्याची वेळ अजून आलेली नाही. ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’ या इस्रायली वृत्तपत्राने अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या वृत्तांमध्ये काही इस्रायली आणि अरब सूत्रांचा हवालाही देण्यात आला आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याने द टाईम्स ऑफ इस्रायलला सांगितले की, “जर इराणने आपला अणुकार्यक्रम संपवण्यास सहमती दर्शवली तर इस्रायल बॉम्ब हल्ले थांबवण्यास तयार आहे.”

दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अण्वस्त्र सुविधांवर हवाई हल्ले केले, तर इराणनेही इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रतिकार केला. या युद्धात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि नुकसान झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये सुमारे 430 जणांचा मृत्यू झाला, तर 3,500 हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.

अमेरिकेनेही या संघर्षात उडी घेतली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन इराणी अणुस्थळांवर हल्ले केल्याचे जाहीर केले होते. यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी इराणला शांततेच्या चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. परंतु इराणने युद्धादरम्यान अण्वस्त्र कार्यक्रमावर कोणतीही चर्चा न करण्याची भूमिका घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;